EaS-E : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदी करायची? फक्त 2 हजारात करा बुक; कशी ते सविस्तर जाणून घ्या

EaS-E : बुधवारी घरगुती स्टार्टअप पीएमव्ही इलेक्ट्रिकने देशातील सर्वात स्वस्त आणि सर्वात लहान इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. दरम्यान ही कार लॉन्च झाल्यापासून ग्राहकांमध्ये खरेदी करण्यासाठी चर्चा रंगू लागल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनीने ही कार 4.79 लाख रुपये किमतीत लॉन्च केली आहे. ही किंमत पहिल्या 10 हजार ग्राहकांसाठी आहे, त्यानंतर कंपनी त्यात बदलही करू शकते. विशेष बाब म्हणजे तुम्हालाही PMV ची EaS-E कार घ्यायची असेल तर तुम्ही ती फक्त 2 हजार रुपयांमध्ये बुक करू शकता.

बुकिंग केल्यानंतर, तुम्हाला कारच्या डिलिव्हरीच्या वेळी उर्वरित रक्कम भरावी लागेल. मात्र, या काळात तुमच्याकडे फायनान्सचा पर्यायही असेल आणि तुम्ही या कारवर बँक फायनान्सही घेऊ शकाल. ही खास इलेक्ट्रिक कार तुम्ही कशी बुक करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Advertisement

कार बुक करण्यासाठी pmvelectric.com ला भेट द्या.
येथे तुम्हाला प्री ऑर्डर बुकिंगचा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये तुमची आवश्यक माहिती भरण्यासोबतच कारचा रंग निवडा.
यानंतर तुम्हाला प्री ऑर्डरवर क्लिक करावे लागेल.
यासोबतच पेमेंटचे पर्याय तुमच्या समोर येतील.
तुम्ही कोणत्याही ऑनलाइन मोडद्वारे पैसे देऊन तुमची कार येथे बुक करू शकता.

शहराच्या राइडसाठी डिझाइन

EaS-E सिटी राइडिंगसाठी डिझाइन केले आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 160 किमी. ची श्रेणी देईल कारमध्ये पुढील आणि मागील बाजूस प्रत्येकी एक सीट आहे. यामध्ये मागची सीट थोडी मोठी असल्याने दोन प्रौढ आणि एक मूलही एकत्र बसू शकतात.

Advertisement

कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, एक यूएसबी चार्जिंग पोर्ट, एअर कंडिशनिंग, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि एअरबॅग्स तसेच सीट बेल्ट्स मिळतील.

याशिवाय, कारमध्ये वेगवेगळ्या राइडिंग मोड्स, पाय-फ्री ड्रायव्हिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल आणि कनेक्टेड स्मार्टफोनवरून कॉल कंट्रोलची सुविधा देखील मिळेल.

Advertisement