अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राहुरी कारखान्याच्या सुबत्तेच्या काळात उत्तम प्रकृती असलेल्या विवेकानंद नर्सिंग होमची तब्येत आता पूर्णपणे खालावली असून या विवेकानंद नर्सिंग होमला आता उपचारांची गरज आहे.
काल नर्सिंग होमच्या अतिदक्षता विभागात एका १७ वर्षीय पायल मुसमाडे या तरुणीने फाशी घेऊन आत्महत्या केल्यानंतर हा विषय चव्हाट्यावर आला आहे.
एकेकाळी विवेकानंद नर्सिंग होमही परिसरासाठी वरदान ठरलेली अत्यंत उपयोगी व रुग्णांचा जीव वाचवणारी आस्थापना म्हणून परिसरात सर्वत्र नर्सिंग होमची चर्चा असायची. मात्र जशी कारखान्याची परिस्थिती कर्जबाजारी झाली तशी नर्सिंग होमची दुरवस्था होत गेली.
खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या ताब्यात सत्ता आल्यानंतर नर्सिंग होममध्ये सुधारणा होऊन पुन्हा रुग्णांना वेळेत औषध उपचार होतील अशी अशा लोकांना होती परंतु ती पूर्णपणेफोल ठरली आहे.
डॉ.तनपुरे कारखाना निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असून सध्या डॉ.सुजय विखे यांच्या ताब्यात असून
याच कारखान्याशी संलग्न विवेकानंद नर्सिंग होममध्ये सध्या आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याने डॉ.विखे कशाप्रकारे लक्ष घालता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.