अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या स्तरावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नागरिकांना संदेश दिला आहे.
दरम्यान सामान्य नागरिकांनी स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा विळखा रोखायचा असेल तर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासह इतर महत्त्वाच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील सोशल मीडियावर असाच एक संदेश सामान्यांना दिला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे महत्व त्यांनी यातून पटवून दिले आहे.
यात शरद पवारांनी असे म्हटले आहे की, ‘सोशल डिस्टन्सिंगची ताकद, योग्य काळजी हाच उपाय’. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये त्यांनी हे ट्वीट केले आहे.