अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- खा. सुजय विखे म्हणतात साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी ‘ही’ व्यक्ती असावी ! जागासह देशात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तम प्रकारे उपाययोजना केल्या आहेत.
त्या अन्य कोणत्याही पंतप्रधानाला करता येणे शक्य झाल्या नसत्या. त्यामुळे इंधन दरवाढीवरून मोर्चा काढण्यापेक्षा पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा द्या. परंतू सध्या राज्यातील सरकार हे सेवेसाठी नाही तर मेवासाठी एकत्र आलेले सरकार आहे.
त्यामुळे दुसरे काहीच दिसत नाही अशी टीका खा. डॉ. सुजय विखे यांनी केली. इंधन दरवाढीवर केंद्र सरकार उपाययोजना करेलच. मात्र दरवाढीच्या नियंत्रणापेक्षा सध्या कोविड नियंत्रणासाठी वेळेत लसीकरण व लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
लसीकरणासाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढून नंतर ते रद्द केले. आता केंद्र सरकारच्या नावाने टीका केली जाते. परंतू या सरकारने केंद्राकडे किती पाठपुरावा केला. इंधन दरवाढीवरून या सरकारमधील पक्ष मोर्चे, आंदोलने करीत आहे.
त्याच सोबत साई संस्थानच्या विश्वस्त मंडळात व्हीजन असलेली व्यक्ती अध्यक्षपदी पाहिजे. एखाद्या उद्योगपतीला संस्थानचे अध्यक्ष केले पाहिजे. तेव्हाच काही बदल होईल असे ते म्हणाले.