Health Tips:- ऍसिडिटी किंवा पोटात जळजळ होणे या समस्या आता अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. यातील गॅस आणि ऍसिडिटी मोठ्या प्रमाणावर आता बऱ्याच जणांना त्रासदायक ठरत आहे.
साधी चहा किंवा दूध जरी घेतले तरी ऍसिडिटीची समस्या उद्भवते. यामध्ये दैनंदिन आहारातील अनियमित वेळा, मसाल्याचे पदार्थाचे जास्त सेवन तसेच जंक फूड, तेलकट पदार्थ इत्यादी जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे या समस्या उद्भवू शकतात.
ऍसिडिटी पासून मुक्तता मिळावी याकरिता अनेक अँटॅसिड औषध देखील घेतली जातात. परंतु आराम दिसून येत नाही. यातील मळमळ किंवा उलट्या, बद्धकोष्ठता, जुलाब, आंबट ढेकर येणे तसेच छातीत जळजळ इत्यादी समस्या या पोटातील उष्णतेमुळे निर्माण होतात.
पोटामध्ये जर उष्णतेचे प्रमाण वाढले तर पचनसंस्थेवर देखील याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरम किंवा उष्ण पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. त्यामुळे या समस्यांपासून जर मुक्तता हवी असेल तर काही महत्त्वाच्या घटकांचे किंवा फळांचे सेवन करणे गरजेचे आहे.
हे स्वस्तातले पाच पदार्थ खा आणि ऍसिडिटी व जळजळीपासून मुक्तता मिळवा
1- ताक- जेवण करताना त्यासोबत जर तुम्ही मसालेदार ताक घेतले तर पोटाला शांत करण्यासाठी ते अतिशय प्रभावी असे ठरू शकते. ताक हे शरीराला फक्त थंड करत नाही तर चयापचय क्रिया देखील वाढवते. एवढेच नाही तर ताकामध्ये खनिज आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पोटातील उष्णतेपासून तात्काळ आराम मिळतो.
2- केळ- पोटातील जळजळीपासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर तुम्ही केळीचे सेवन करणे गरजेचे आहे. केळीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. पोटातील आम्लता संतुलित करण्यासाठी व ते थंड आणि आरामदायी ठेवण्यास देखील मदत करते.
3- काकडी- काकडी मध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते व पोट थंड ठेवण्यासाठी काकडीचा उपयोग उत्तम पद्धतीने होऊ शकतो. काकडी मध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते त्याचा उपयोग पचन सुधारण्यासाठी होतो. काकडीचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता नियंत्रणात आणता येते आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते.
4- नारळाचे पाणी- नारळाचे पाणी थंड असते व याचे सेवन केल्यामुळे शरीराला देखील चांगला थंडावा मिळतो. नारळाच्या पाण्यामध्ये खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर असतात. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला चांगले हायड्रेटेड ठेवण्यासाठी ते मदत करते व पोटातील उष्णता देखील कमी करण्यास मदत होते.
5- दही- दह्यामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असल्यामुळे पोटाला शांत ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. पोटातील उष्णता आणि छातीतील जळजळ कमी होण्यासाठी देखील दही उपयुक्त आहे. जर तुम्ही उकडलेल्या भातासोबत दही खाल्ले तर पोटाला पटकन आराम मिळतो.
अशा पद्धतीने जर तुम्हाला गॅस तसेच बद्धकोष्ठता, ऍसिडिटी व पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करून होणारा त्रासापासून मुक्तता मिळवू शकतात.