अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- पावसाळ्यात नेहमीच बळावणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी बीट, गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काकडी, तळलेले पदार्थापासून दूर राहण्यासाठी सागितले जाते.
पचनक्रिया सुरळीत हाेण्यासाठी दरराेज एक लिंबू आहारात असायला हवा, असा सल्ला आहारतज्ञांनी दिला आहे. सध्या पावसाळ्याचं आगमन झालं आहे.
या ऋतूमध्ये अनेक आजार डोके वर काढू शकतात. यासाठी आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं महत्वाचं आहे. काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल.
त्यांच्या सेवनाने अनेक आजार बरे होण्यास मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह चांगला होण्यापासून कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आळशीच्या बीया फायदेशीर ठरतात.
शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते. तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.
पाेळी नको भाकरी खा पावसाळ्यात दोन्ही वेळेचा आहार लवकर घेतला पाहिजे. जेवनात रोज एक लिंबू खाल्यास अनेक आजार दूर राहतात. आहारात फळभाज्यांचा वापर करावा. तसेच पोळीऐवजी भाकरी खाणे अधिक फायदेशीर ठरेल
आजारी व्यक्तींनी असा घ्या आहार