Winter Special Laddu : हिवाळ्यात टिकवायची असेल रोगप्रतिकारशक्ती तर खा ‘हे’ लाडू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Winter Special Laddu : संक्रांतीच्या सणाला तीळ आणि गूळ खाण्याला एक खास महत्त्व आहे. परंतु, हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी तीळ-गूळ खातात.

हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते. यामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे तिळाचे लाडू खाणेही फायदेशीर असते. ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी हे लाडू खाणे उत्तम असते.

तिळाच्या लाडूचे फायदे

  1. दातांसाठी तिळाचे लाडू फायदेशीर असतात. त्याचबरोबर केसांच्या वाढीसाठी तिळाचे तेल चांगले असते.
  2. लघवी स्वच्छ होण्यासाठी तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होते.
  3. हिवाळ्यात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाल्ली तर महिलांना पाळीत कमी रक्तस्त्राव होतो
  4. त्याचबरोबर हिवाळ्यात तिळाच्या शेंगदाण्याच्या कूटाचा वापरला तर तो आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

लाडू बनवण्यासाठी साहित्य

  • 1 कप पांढरे तीळ
  • 1/2 कप खवा
  • 1/2 कप गूळ
  • चिमूटभर केशर
  • 2 टीस्पून कॅनोला तेल
  • 2 चमचे फुल क्रीम दूध

अशाप्रकारे बनवा लाडू

सर्वप्रथम कढईत तेल टाका. त्यानंतर त्यामध्ये ते तीळ घालून हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत टाळून घ्या. भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढा त्यानंतर आता गरम दुधात केशर भिजवून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात गूळ वितळावा.

ते अर्धवट राहेपर्यंत सतत ढवळा. ते मिश्रण घट्ट होण्याअगोदर त्यात केशर दूध घालून मिक्स करावे. मऊ खवा आणि तीळ घालून चमच्याच्या मदतीने चांगले मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवट हाताला थोडे तेल लावून त्या मिश्रणातून मध्यम आकाराचे लाडू बनवा.