अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाने आज संपूर्ण देशात धुमाकूळ घातला असून, सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे.
त्यामुळे ही वेळ राजकरण करण्याची नसून, या कोरोना महामारी विरोधात सर्वच लोकप्रतिनिधींसह राजकारणी समाजकारणी तसेच अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लढण्याची असल्याचे नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणच्या कोविड सेंटरला त्यांनी काल भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाचा कहर पूर्ण देशात, राज्यात ,जिल्ह्यात तसेच पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागात पोहोचला आहे.
याविरोधात सर्वच राजकारणी समाजकारणी व सामाजिक लोकांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. कोरोना विषाणु विरोधात कुठलेही प्रकारची गरज असेल प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून लागत असेल
तर आम्ही सर्व तत्पर असून, जनतेनेही प्रशासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. रेमेडीसेवर ही लस कोरोनावर अंतिम उपचार नसून, ही लस बिगर घेताही रूग्ण बरे होऊ शकतात,
त्यामुळे जनतेने रेमडेसिव्हिर लस मिळवण्यापेक्षा आपल्या गावात परिसरात तालुक्यात कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील राहावे. असे सांगून या ठिकाणी जी जी मदत लागेल देण्यास आपण बांधील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आपली जबाबदारी ओळखून या काळात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी ते म्हणाले.