Eclipse 2023 : यावर्षातील सूर्य आणि चंद्रग्रहणाचा होईल तुमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव, जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eclipse 2023 : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य मेष राशीत असणार आहे. तसेच ग्रहणानंतर दोनच दिवसांनी गुरु मेष राशीत प्रवेश करून सूर्याशी संयोग साधणार आहे.

तसेच या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी असणार आहे. हे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कसे असणार आहे? त्याचा काय परिणाम होईल. वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाबद्दल आणि चंद्रग्रहणाबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगितले आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

जाणून घ्या यावर्षातील ग्रहण आणि त्यांचे परिणाम

वर्षातील पहिले ग्रहण :

या वर्षातील पहिले ग्रहण हे सूर्यग्रहण असणार असून ते 20 एप्रिल रोजी होणार आहे. पंचांगनुसार, हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी 7:04 ते दुपारी 12:29 पर्यंत असणार आहे. परंतु हे लक्षात घ्या की हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळही वैध ठरत नाही. हे ग्रहण दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर तसेच अंटार्क्टिका या देशांमध्ये दिसेल.

वर्षातील दुसरे ग्रहण :

या वर्षातील दुसरे आणि पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी होणार आहे. चंद्रग्रहण हे छाया चंद्रग्रहण असणार आहे, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध ठरत नाही, हेदेखील ते भारतीयांना दिसणार नाही. युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरावर दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८.४५ ते पहाटे १ वाजेपर्यंत राहणार आहे.

वर्ष 2023 चे तिसरे ग्रहण:

या वर्षातील तिसरे ग्रहण सूर्यग्रहण असणार आहे, जे 14 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असून हे देखील भारतीयांना पाहता येणार नाही. त्यामुळे याचा देखील सुतक कालावधी वैध ठरत नाही. हे ग्रहण टेक्सास, मेक्सिको, मध्य अमेरिका, कोलंबिया, ब्राझीलचा काही भाग, अलास्का आणि अर्जेंटिना या ठिकाणी दिसेल.

वर्षातील शेवटचे ग्रहण:

तसेच या वर्षातील चौथे आणि शेवटचे ग्रहण 28 ऑक्टोबर रोजी दिसणार असून हे चंद्रग्रहण असणार आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी होणारे हे ग्रहण भारताच्या काही भागात पाहायला मिळेल. त्यामुळे याचा सुतक कालावधी वैध असणार आहे.

हे एक आंशिक चंद्रग्रहण असून हे भारताशिवाय युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण आफ्रिका, आर्क्टिक, अंटार्क्टिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंद महासागरासह आशियातील अनेक देशांमध्ये दिसून येईल.

येईल नैसर्गिक आपत्ती

या वर्षी होणार्‍या 4 ग्रहणांचा सर्व राशीच्या लोकांवर खूप मोठा प्रभाव पाडणार आहे. काही लोकांसाठी हे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. तर दुसरीकडे, या ग्रहणांचा देश आणि जगावर काय परिणाम होतो याबद्दल बोलायचे झाल्यास ज्योतिषशास्त्रानुसार ते नैसर्गिक आपत्तीचे कारण बनण्याची दाट शक्यता आहे. या ग्रहणांमुळे भूकंप, पूर, सुनामी येऊ शकते. इतकेच नाही तर विमान अपघात, राजकीय अस्थिरता निर्माण होईल. व्यवसायात तेजी येऊन रोजगाराच्या संधी वाढणार आहे.