ताज्या बातम्या

वसुलीत कोणाचा वाटा, तुमचे कमिशन किती? ईडीने अनिल देशमुख यांना विचारले ‘हे’ प्रश्न…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. याआधी त्यांना ५ वेळा समन्स बजावण्यात आले होते.देशमुख यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक झाली. 

राज्यात गाजलेल्या ‘वसुली प्रकरणात’ अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. देशमुख यांनी गृहमंत्री असताना 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या संदर्भात त्याची चौकशी करण्यात येत आहे.

देशमुखांकडून ईडी कडून पुढील प्रश्न विचारण्यात आले. 

माजी एपीआय सचिन वाजे यांना तुम्ही ओळखता का?

मुंबई पोलिसांचे एसीपी सचिन पाटील यांना तुम्ही ओळखता का?

सचिन वाजे आणि सचिन पाटील यांच्या किती वेळा भेटी झाल्या? आणि या बैठकांचा उद्देश काय होता?

या बैठकांमध्ये बार आणि रेस्टॉरंटमधून दर महिन्याच्या वसुलीवर चर्चा झाली का?

सचिन वाजे आणि सचिन पाटील यांना वसुलीचे टार्गेट दिले होते का?

बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून कधीपासून वसुली केली जात होती?

कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे तुमच्यासोबत काम करतात का?

सचिन वाजे यांनी किती वसुली केली आणि शिंदे यांना किती दिले? डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान वाजे यांनी शिंदला किती रक्कम दिली?

श्री साई शैक्षणिक संस्था तुम्ही किंवा तुमचे कुटुंब चालवत आहात का?

तुमच्या ट्रस्टला ४.३ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. ही देणगी कोणी दिली?

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचे प्रकरण पाहिले का?

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी किती रक्कम आकारण्यात आली?

बदली आणि पोस्टिंगमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे?

गृह मंत्रालयाने बदली आणि पोस्टिंगद्वारे किती पैसे जमा केले?

तुमच्याशिवाय आणखी कोणाला फायदा झाला?

किरीट सोमय्या म्हणाले – 100 दिवस कोठडीत राहावे लागेल

ईडीसमोर देशमुख यांच्या हजेरीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खिल्ली उडवली. शेवटी ईडीसमोर हजर व्हावे लागले, असे ते म्हणाले. 100 कोटींचा हिशेब देण्यासाठी 100 दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागेल, असे सोमय्या म्हणाले.

काय आहे प्रकरण :- मार्चमध्ये परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांना होमगार्डचे डीजी बनवण्यात आले.

यानंतर परमबीर सिंह यांचे एक पत्र समोर आले, जे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाजे यांच्याकडे दरमहा १०० कोटींची मागणी केल्याचा दावा त्यांनी या पत्रात केला होता.

यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office