खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले, वाचा काय आहे आजची परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  कोरोना काळात सर्वसामान्यला आर्थिक फटका बसला असून, सर्वसामान्य नागरिकांसमोरची संकटाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. आधीच कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळित झाले असून अनेकांचा रोजगार हिरावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलांने उच्चांक गाठला असून, त्यामुळे डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ महागाईदर 5.59% वर पोहोचला आहे. हा आकडा भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या महागाई दराच्या कमाल मर्यादच्या अगदी जवळ आहे.

तसेच सरकारी आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये, भाज्यांचा महागाई दर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत कमी होऊन त्यात 2.99% ची घसरण झाली आहे.

Advertisement

या कालावधीत खाद्यतेलाच्या महागाई दरात 24.32% तर इंधन आणि विजेच्या महागाई दर 10.95% एवढी वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात महागाई वाढली असून यापूर्वी, नोव्हेंबर 2021 मध्ये किरकोळ महागाई दर 4.91% होता, ऑक्टोबरमध्ये 4.48% होता.

तर सप्टेंबर 2021 मध्ये हा ऑगस्ट 2021 च्या तुलनेत 4.35% पर्यंत खाली आला होता. ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा 5.3% होता. तर गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये हा दर 4.59% होता.

खान्या-पिण्याच्या वस्तूंचे भाव वाढले असून अन्नधान्य आणि रेशनच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने महागाईचा दर वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत.

Advertisement

त्यातच भर म्हणून जीवनावश्‍यक वस्तूंच्या भावात सातत्याने वाढ होते आहे. डिसेंबर महिन्यात खाद्य पदार्थांच्या महागाईचा दर 4.05 टक्के झाला आहे.

जो नोव्हेंबर 2021 मध्ये केवळ 1.87% होते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने बुधवारी किरकोळ महागाई दर डिसेंबर 2021 ची आकडेवारी प्रसिद्ध केली

Advertisement