अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई ही एक चपराक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- राजकीय सुडापोटी केंद्र सरकार काम करत आहे, तपास एजन्सी काम करत आहेत, असे आरोप करणऱ्यांना

आजची अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई ही एक चपराक असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची ४.२० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली.

यावर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी सांगितले की, ईडीच्या तपास प्रक्रियेत देशमुख यांची ही प्रॉपर्टी मिळालीय आणि ती सीझ झालीय याचा अर्थ असा की, अशी प्रॉपर्टी होती.

म्हणूनच त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत व तपासात तथ्य आहे. म्हणूनच ही कारवाई करण्यात आली आहे.

पण कोणत्याही तपास यंत्रणेला मनमानी करता येत नाही, असे आपण नेहमीच सांगायचो त्यामुळे भाजपा, केंद्र सरकार व तपास यंत्रणेवर आरोप करणाऱ्यांचे आता तरी यामुळे समाधान होईल.

कारण आता या प्रकरणात तथ्य आहे आणि भविष्यामध्ये यामधील एक एक गोष्टी आणि सत्य लोकांसमोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24