अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
याचाच फायदा जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. शिक्षणमंत्र्याच्या घोषणेमुळे नगर जिल्ह्यातील ५ हजार ३७६ शाळांमधील पहिले ते आठवीचे ६ लाख २१ हजार ६७९ विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत.
जाणून घ्या जिल्ह्यातील मागील शैक्षणिक वर्षातील वियार्थ्यांची संख्या
नगर जिल्ह्यात २०१९-२० च्या पटसंख्येनूसार सर्व व्यवस्थापनाच्या ५ हजार ३७६ शाळा असून यात पहिली ते आठवीचे ३ लाख ३६ हजार ७४६ विद्यार्थी आणि २ लाख ८४ हजार ९३३ विद्यार्थीनी आहेत.
तालुकानिहाय अकोले ३६ हजार ५९१, राहाता ४६ हजार ४६८, राहुरी ४४ हजार ८५२, संगमनेर ६३ हजार ७७०, शेवगाव ३५ हजार ५०४, श्रीगोंदा ३७ हजार ६९५, श्रीरामपूर ३९ हजार ३८८ , जामेखड २० हजार ९००,
कर्जत २९ हजार ३७१, कोपरगाव ४६ हजार ९५४, नगर ४६ हजार २९७, नेवासा ५२ हजार १८८, पारनेर ३४ हजार ३६७, पाथर्डी ३४ हजार ४४४, महापालिका ५२ हजार ८९० विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.