अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी बबन शिंदे, वैभव शिंदे, निलेश बांगर, श्रीराम खाडे, मुख्याध्यापक संघटनेचे सहसचिव जमीर शेख, राज पठाण, तौसीफ शेख, दीपक कराळे, सुखदेव नागरे, रखमा दरेकर, सत्यवान कांबळे, सतीश वाणी, अनिल जाधव, असिफ शेख, वैभव शिंदे, किशोर बरकडे, सत्यदान कांबळे, नासिर शेख, रियाज शेख आदी उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी बाबासाहेब बोडखे यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. जळगाव येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन संपुर्ण राज्यात शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
बोडखे यांच्या कार्याची दखल घेऊन फाऊंडेशनच्या वतीने औरंगाबाद उपजिल्हाधिकारी अंजली धाणोरकर यांनी सदर पुरस्कार जाहीर केला. बोडखे यांना हा पुरस्कार दि.21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
बाबासाहेब बोडखे शहरातील पंडित नेहरु हिंदी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ते विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून ते शासनस्तरावर प्रश्न मांडत आहे. त्यांनी नेहमीच समाजातील गोर, गरीब व गरजू घटकांना मदतीचा हात दिला आहे.
कोरोनाच्या महामारीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकाचे वाटप केले. निराधार बेवारस मनोरुग्णांचा सांभाळ करणार्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात जाऊन मनोरुग्णांसह दिवाळी साजरी केली. त्यांना अन्न-धान्य, कपडे व मिठाईचे वाटप केले.
त्याबरोबरच तपोवन रोडलगत मतिमंद मुलांची शाळा , येथे सर्व मुलांना कपडे , किराणा व सहा महीने पुरेल इतके धान्य दिले . हातावर पोट असलेल्या कामगारांचा रोजगार हिरावला असताना त्यांना देखील किराणा साहित्याची मदत दिली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ठिकठिकाणी जाऊन जनजागृती केली.
नागरिकांना मास्क, हॅण्डग्लोव्हज् व सॅनीटायझरचे वाटप केले. तसेच कोविड केअर सेंटरला विविध साहित्याची मदत देऊन कोरोना रुग्णांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व्याख्यान व योगा प्राणायामचे धडे दिले.
तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर आल्यने पूरग्रस्तांना स्वखर्चाने अन्न-धान्य व शैक्षणिक साहित्याची मदत देखील पाठवली. त्यांचे हे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य स्फुर्ती देणारे व सर्वांसाठी दिशादर्शक असून,
या कार्याची दखल घेऊन त्यांना फाऊंडेशनच्या वतीने 2021 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.एस.एम. उज्जैनकर यांनी सांगितले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.