file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  नगर जिह्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. पांढरीचा पूल, नेवासा एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

घोडेगाव ते सोनई या आठ किलोमीटरच्या रस्तेकामाचे भूमिपूजन सुभाष देसाई यांच्या हस्ते व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते. तसेच पुढे बोलताना देसाई म्हणाले कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातले मंत्री म्हणून त्यांची ओळख म्हणून शंकरराव गडाख यांची ओळख आहे.

मात्र, तरीही मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ न देता गडाख यांचा विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू असतो. नेवासा तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने आग्रही असतात.

त्यामुळे नेवाशासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. नेवासा तालुक्याच्या विकासकामांत ना सुभाष देसाई यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.

पुढील काळात उद्योगमंत्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरी पूल एमआयडीसीचा कायापालट करून नवीन उद्योग, व्यवसाय आणून तालुक्याच्या विकासात सहकार्य करावे, असे आवाहन गडाख यांनी केले.