अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-गेल्या महिन्यात जामखेड शहरात कोरोना रुग्णांची संख्या शुन्य झाली होती. मात्र शहरासह तालुक्यात येत्या दहा दिवसांत तब्बल आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
त्यामुळे आता तरी नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडन केले आहे. राज्यातील कोरोना व्हायरसच्या साथीने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्याच्या ग्रामीण भागांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचाच परीणाम जामखेड तालुक्यात देखील दिसुन येत आहे.
गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शुन्य झालेली आकडेवारी दिलासादायक ठरली असली तर तब्बल दहा ते बारा दिवसात जामखेड शहरासह तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तब्बल बारा दिवसात आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने याबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आरोग्य प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे.