अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- शहरातील खड्डयाचे प्रमाण इतके वाढले आहे की प्रशासन नागरी सुविधा देण्यास अकार्यक्षम झाले असल्याने एक तर नागरी सुविधा द्या किंवा घरपट्टी माफ करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मनपा आयुक्त गोरे यांच्याकडे केली आहे.
सध्या अहमदनगर शहरातील रस्त्यांची परिस्तिथी अतिशय गंभीर व भयानक झाली असून . रस्त्यावर इतके खड्डे झालेत की काही ठिकाणी रस्ते आहेत की खड्डे हेच कळत नसून खड्डयामधून रस्ता शोधावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे अत्यंत हाल होत आहेत परंतु या बाबत नागरिक,
प्रशासन वा लोकप्रतिनिधी कोणीही भ्रशब्द काढायला तयार नाहीत, ही गंभीर परिस्तिथी नगरमध्ये निर्माण झाली आहे. पूर्वी गणपती व मोहरम सण आले की रस्त्यांची डागडुजी व्हायची व त्यामुळे का होईना रस्ते काही दिवस खड्डे विरहित होत होते.
परंतु या वेळी मोहरम गणेश उत्सव येऊन ही खड्डे जशाचे तसे आहेत, या बाबत प्रशासन बेजबाबदार वागतेय की लोकप्रतिनिधी हे कळायलाच तयार नाही. नक्कीच कोरोना प्रादुर्भावमुळे प्रशासनास निधी मिळत नसेल परंतु महानगरपालिकेने नागरिकांकडून घरपट्टी वसूल करणे थांबवलेली नाही,
मग त्या पैशातून का होईना ही खड्डे जर बुजविले तर बरे होईल. यासाठी प्रशासनाने नागरिकांना नागरी सुविधा द्या किंवा आर्थिक संकट दूर करून घरपट्टी तरी माफ करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बोज्जा यांनी केली आहे.