‘एक हसीना थी, एक दिवाना था ’… . लॉकडाऊनचे सर्व नियम मोडत चक्क मोठ्या अधिकाऱ्याचे भलतेच….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णवाढीच्या बाबतीत जिल्हा अव्वल राहिला.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात कडक नियम लागू केले. परंतु आता सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून प्रशासनातीलच एक मोठा अधिकारी हे सर्व नियम धुडकावून वाढदिवसाची पार्टी साजरी करताना दिसत आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल… महापालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने कोविडचे सर्व नियम धुडकावत वाढदिवसाची पार्टी साजरी केल्याचा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतुन समोर आला आहे.

डॉ. अनिल बोरगे एका निवासस्थानी पार्टी ! मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे एका निवासस्थानी चक्क ‘एक हसीना थी’ हे गाणे तालासुरात गाताना या व्हिडिओत दिसत आहेत. लॉकडाऊनचे सर्व नियम तोडून काही महिला व पुरुष या पार्टीत सहभागी झालेले दिसतात.

मोठ्या प्रमाणावर टीका : काहींच्या गळ्यात मास्क नावापुरता असून हा कोविड काळातीच व्हिडिओ आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

पल पल दिल के पास रहती थी’… काही नागरिकांनी तो महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही पाठविला आहे. या अधिकाऱ्याने स्वत:च्या दालनातही गाणे गातानाचा एक व्हिडिओ शूट केला आहे.

त्यात हा अधिकारी ‘पल पल दिल के पास रहती थी’ असे भलतेच रोमॅंटिक गाणे गाताना दिसत आहे. याही व्हिडिओत त्याच्या टेबलवर बुके दिसत असून हे दोन्ही व्हिडिओ एकाच दिवशीचे आहेत.

पार्टीवर काय कारवाई करणार ? कोविड काळात नागरिकांचे आरोग्य जपणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र, महापालिकेचे आरोग्य अधिकारी गाणे व पार्टीत दंग आहेत.

दरम्यान सामान्य नागरिकांना रस्त्यावर फिरू न देणारे महापालिकेचे आयुक्त या पार्टीवर काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24