ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, पहिल्यांदा घेणार यांची भेट

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra news : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज मुंबईत विमानतळावर पोहोचले आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

त्यांना केंद्र सरकारकडूनही विशेष सुरक्षा पुरविण्यात आली आहे.एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी रवाना होत आहे.

राज्यपालांच्या आदेशानंतर बहुमत चाचणीला सामोरं न जाता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न होते.

त्यामुळे ही परि्स्थिती उद्भवली. आपण बाळासाहेबांच विचार पुढे घेऊन जाऊ या, अशी भावना ५० आमदारांची होती. यावर वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. हे जे घडले आहे, त्याचा आम्हाला कोणालाही आनंद वाटत नाही. असेही शिंदे म्हणाले.

Ahmednagarlive24 Office