Maharashtra news : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस चव्ह्याट्यावर आली आहे. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये
गोंधळाला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपा १२३ मतं मिळाली होती.
मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे
एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यानंतर त्यांनी पहिली फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग…”, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
शिवसेनेचे काही आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती मिळाली आहे. कालच्या शिवसेनेच्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर असल्याची माहिती समजली होती. तेचं आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहाजी बापू पाटील, महेश शिंदे सातारा, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार इत्यादी आमदार सोबत असल्याची माहिती मिळाली आहे.
काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जातेय. विधान परिषद निकालानंतर शिवसेनेमध्ये खदखद आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मोठा राजकीय निर्णय घेणार का, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय.