अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर नगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.अमरधाम परिसरात स्व. गांधी यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं काल (दि.१७ रोजी ) पहाटे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात कोरोनाने निधन झाले.त्यानंतर त्यांचे पार्थिव काल दुपारी ४ वाजता नगरला त्यांच्या निवास स्थानी आणण्यात आले. तेथून त्यांची अंतयात्रा काढण्यात आली.
सायंकाळी ६ च्या दरम्यान नगर च्या अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर दिलीप गांधी अमर रहे च्या घोषणात, भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांसह पोलिस आणि सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते तहसिलदार उमेश पाटील आणि उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी सरकारतर्फे श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, अंत्यसंस्कार सरकारी इतमात का केले नाहीत? पोलिसांनी सलामी का दिली नाही, असे प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केले.
गांधी यांच्या कन्या नवसारीकर यांनी यावरून अधिकाऱ्यांच धारेवर धरले. तीन वेळा खासदार, एकदा केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या आपल्या वडिलांवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार का केले नाहीत?
यात कोणी राजकारण आणत आहे का? असा सवाल करून त्या अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. मात्र, यासंबंधी वरिष्ठस्तरावरून आपल्या काहीही सूचना आल्या नसल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.
काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते अनिल राठोड यांचेही करोनामुळे निधन झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते, यी आठवण कार्यकर्त्यांनी करून दिली.