अकोले तालुक्यातील 15 ग्रामपंचायतचे सरपंच -उपसरपंच पदाची निवड जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. तसेच निवडणुकांचे निकाल देखील जाहीर झाले आहे.

आता सर्वांचे लक्ष लागून राहिले ते म्हणजे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार? दरम्यान नुकतेच काही ठिकाणी सरपंच पदांची घोषणा करण्यात आल्या आहेत. अकोले तालुक्यातील 15 ग्रामपंचायतचे सरपंच ,उपसरपंच पदाची निवडणूक काल शांततेत पार पडली. यात अनेक मोठ्या गावांचा समावेश आहे.

15 ग्रामपंचायतचे सरपंच -उपसरपंच पदाची निवड पुढीलप्रमाणे कळंब- सरपंच उत्तम लांडगे, उपसरपंच-श्रीमती शकुंतला कदम, शेरणखेल- सरपंच दीपक पथवे, उपसरपंच प्रकाश कासार, औरंगपूर,-सरपंच पद रिक्त, उपसरपंच- प्रकाश पाचपुते, तांभोळ-सरपंच पद रिक्त,

उपसरपंच- सुखदेव लक्ष्मण कडाळे, उंचखडक बुद्रुक – सरपंच श्रीमती सुलोचना भाऊसाहेब शिंदे, उपसरपंच- महिपाल उर्फ बबनराव प्रल्हाद देशमुख, आंबड-सरपंच श्रीमती रेश्मा भास्कर कानवडे, उपसरपंच- नाथु भिका भोर, मोग्रस- सरपंच सौ.ज्योती गायकर , उपसरपंच संजय गोडसे, बोरी-, सरपंच राहुल साबळे,

उपसरपंच निलेश गंभिरे, धामणगाव पाट,- सरपंच दीपक पारधी, उपसरपंच बाळू भोर, लहित- सरपंच मंगल चौधरी, उपसरपंच-विवेक चौधरी, परखतपुर -सरपंच पद रिक्त, उपसरपंच भारत वाकचौरे, निळवंडे -सरपंच भाऊसाहेब मेंगाळ, उपसरपंच संजय कोकणे, नाचणठाव-सरपंच अंजनाबाई मधे,

उपसरपंच मच्छिद्र बर्वे, भोळेवाडी,-सरपंच बाळू उंबरे, उपसरपंच-सुजाता देशमुख, चितळवेढे,-सरपंच श्रीमती ताईबाई पथवे, उपसरपंच-नवनाथ आरोटे,बदगी – सरपंच -प्रणेश किसन शिंगोटे, उपसरपंच- धिरज दिलीप शिंगोटे,

वाघापूर – सरपंच श्रीमती सिमा दत्त लांडे, उपसरपंच-श्रीमती रोहणी संजय औटी, चैतन्यपूर-सरपंच नितिन बाळु डुंबरे, उपसरपंच-महेश भाऊसाहेब गवांदे, जाचकवाडी येथील सरपंच व उपसरपंच पदासाठी होणारी सभा तहकूब करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24