अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक गोष्टी पुन्हा बदलू लागल्या आहेत. तसेच प्रशाकीय पातळीवर पुन्हा अनेक निर्णय घेण्यात येऊ लागले आहे.
दरम्यान वा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सहकार खात्याने आधीच सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकल्या आहे.
त्यानुसार आता 24 जानेवारीपासून राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणूका पुढील तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश सहकार खात्याचे उपसचिव का. गो. वळवी यांनी काढले आहेत.
20 जुलै 2020 ला राज्य सरकारने आदेश काढून बाजार समित्याच्या निवडणूका 23 जानेवारी 2021 पर्यंत पुढे ढकल्या होत्या. जानेवारीत कोरोनाचे प्रमाण कमी झाले होते तसेच रुग्ण रिकव्हरी रेट देखील सुधारला होता.
मात्र जसजसा फेब्रुवारी महिना सुरु झाला कोरोनाच्या आकडेवारीमध्ये देखील वाढ होऊ लागली यामुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली.
राज्यात पुन्हा करोना संसर्गाचा प्रभाव वाढल्याने 24 जानेवारी पासून पुढील तीन महिन्यांसाठी बाजार समित्यांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे आता मार्चनंतरच राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणूका होणार आहेत.