ताज्या बातम्या

Electric 2 Wheeler : अल्पावधीतच ‘या’ इलेक्ट्रिक दुचाकीने घेतली हिरो आणि ओलाची जागा, जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Electric 2 Wheeler : ओकिनावा ऑटोटेक (Okinawa Autotech) या इलेक्ट्रिक स्कूटरने (Electric 2 Wheeler) भारतात असणाऱ्या आघाडीच्या Hero आणि OLA सारख्या इलेक्ट्रिक ब्रँडला (Electric Brand) मागे टाकले आहे.

आताच्या घडीला ओकिनावा ही सर्वात जास्त विक्री (Sell) करणारी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी बनली आहे. जरी ओकिनावा या इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीने मे महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत 21.51 टक्क्यांनी घट झाली असली तरी जूनमध्ये सुमारे 6,976 दुचाकींची विक्री केली आहे.

अँपिअरने (Ampere) 6,534 युनिट्सची विक्री केली असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. मे महिन्याच्या तुलनेत, या कंपनीने 1,005 युनिट अधिक विकले आहेत. मे 2022 मध्ये, 5,529 अँपिअर युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

विक्रीच्या बाबतीत हिरो इलेक्ट्रिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीच्या जून महिन्यात 2022 मध्ये 6,486 युनिट्सची विक्री झाली आहे. मे महिन्यात हिरोची केवळ 2,739 युनिट्स विकली गेली.

ओला 5,689 युनिट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. टीव्हीएस आयक्यूब पाचव्या क्रमांकावर होती. या कंपनीने जून महिन्यात 2022 मध्ये 4,667 युनिट्सची विक्री केली. कंपनीने मे महिन्यात 2,637 युनिट्सची विक्री केली होती आणि जूनमध्ये 76.98 टक्के वाढ नोंदवली होती.

एथर एनर्जी (Ether Energy) या इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी 3,797 युनिट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. मे महिन्याच्या तुलनेत एथरच्या विक्रीत 22.56 टक्के विक्री झाली आहे. रिव्हॉल्ट 2,419 युनिट्स विकून 7 व्या क्रमांकावर आहे.

तसेच रिव्हॉल्टने देखील सकारात्मक विक्री नोंदवली आहे. मे महिन्याच्या तुलनेत 52 टक्के अधिक युनिट्स विकल्या. Joy eBikes 2,125 युनिट्ससह शेवटच्या स्थानावर आहे.

Ahmednagarlive24 Office