Auto Expo 2023 : ‘या’ दिवशी लाँच होणार 452 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या फीचर्स

Auto Expo 2023 : नवीन वर्षात अनेक जबरदस्त फीचर्स असलेल्या कार्स लाँच होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांनी इलेक्ट्रिक कार्सना पसंती दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे या वर्षात लाँच होणाऱ्या कार्समध्ये सर्वांचे लक्ष इलेक्ट्रिक कारकडे असणार आहे. अशातच आता MG 4 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार प्रदर्शित केली जाणार आहे. जाणून घेऊयात या कारचे डिझाइन आणि फीचर्स.

असे असणार डिझाइन

Advertisement

कंपनीची ही एक स्टायलिश हॅचबॅक कार असणार आहे विशेष म्हणजे याचे डिझाइन क्रॉसओवर डिझाइनसारखी दिसते. यात क्रिस्प लाइन्स, स्पष्ट पृष्ठभाग आणि सायबरस्टर रोडस्टरद्वारे प्रेरित काही तपशील आहेत. समोर मानवी चेहऱ्यासारखे डिझाइन असून यामध्ये एलईडी डे-टाईम रनिंग लाईट मिळत आहे. समोरील बंपरला अनेक टोकदार इनसेट आणि बाहेरील कडांवर अतिरिक्त एलईडी लाइटिंग घटक मिळत आहेत.

पॉवरट्रेन आणि बॅटरी

या कारमध्ये दोन बॅटरी पॅक दिले असून हे मॉडेल जागतिक स्तरावर लॉन्च केले आहे.बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर यात 51kWh आणि दुसरा 64kWh बॅटरी पॅक आहे. यामधील एक बॅटरी बॅक 170hp, तर दुसरी 203hp उत्पादन करते.

Advertisement

दोन्ही प्रकारांवरील टॉर्क आउटपुट 250Nm वर रेट केले आहे. दोन्ही प्रकार सिंगल-मोटर, रियर-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशनसह येतात. 7kW AC फास्ट चार्जरच्या मदतीने ती 9 तासांत 10 ते 100% पर्यंत चार्ज होते.

त्याशिवाय 150kW DC चार्जरसह, ती केवळ 35 मिनिटांत 10 ते 80% पर्यंत चार्ज होतो. लहान बॅटरी पॅक 350km पर्यंत आणि इतर 452km पर्यंतची रेंज देते असा दावा MG चा आहे.

इंटिरियर आणि फीचर्स

Advertisement

या कारच्या इंटीरियरबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये 7-इंचाच्या डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेसह 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. एसी व्हेंट्स डॅशबोर्डमध्ये लपलेले असताना यात ओव्हर-द-एअर अपडेटसह कार तंत्रज्ञान जोडले आहे. त्याशिवाय या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, हवेशीर फ्रंट सीट्स आणि ADAS सूट मिळतो जो अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन करतो.