ताज्या बातम्या

Tata Nano EV : Electric नॅनो येणार नाही ! मात्र सोशल मीडियावर फीचर्स लिस्ट व्हायरल

Published by
Ahmednagarlive24 Office

Tata Nano EV : जेव्हा मार्केटमध्ये टाटा मोटर्सने त्यांची जगभरातली सर्वात स्वस्त नॅनो कार लाँच केली होती. काही दिवसांनी कंपनीला ही कार बंद करावी लागली होती.

लवकरच मार्केटमध्ये नॅनो कमबॅक करणार आहे. ही कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये येणार आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु असून फीचर्स लिस्ट व्हायरल झाली आहे.

व्हायरल झालेली फीचर्स लिस्ट

या छोट्या हॅचबॅकमध्ये 624cc ट्विन-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले होते जे 38bhp आणि 51Nm साठी चांगले होते. 4-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गीअरबॉक्सद्वारे मागील चाकांवर पॉवर पाठविली गेली.

मीडिया रिपोर्टनुसार, टाटा नॅनोला इलेक्ट्रिक ड्राइव्हसह पुन्हा लाँच करेल. टाटा नॅनो ईव्हीच्या अंडरपिनिंग, सस्पेंशन सेटअप आणि टायर्समध्ये बदल केले जाऊ शकतात.

या आहेत टाटाच्या इलेक्ट्रिक कार

भारतात सध्या, टाटा तीन इलेक्ट्रिक कार विकते – यामध्ये Tigor EV, Xpres-T आणि Nexon EV. नुकतीच कंपनीने Tiago EV च्या किंमती जाहीर केल्या आहेत ज्याची किंमत 8.49 लाख रुपयांपासून ते 11.79 लाख रुपयांपर्यंत आहेत.

या इलेक्ट्रिक हॅचबॅकची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे. त्याशिवाय या कारमध्ये दोन लिथियम-आयन बॅटर्‍या दिल्या आहेत ज्या – 19.2 kWh आणि 24 kWh, जी 250 किमी आणि 315 किमी रेंज देते.

Ahmednagarlive24 Office