Electric vehicle : मस्तच! आता भारतात लॉन्च होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, किंमतीसह जाणून घ्या यामध्ये काय असेल खास…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric vehicle : पेट्रोल आणि डिझेलचे (petrol and diesel) दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहने अधिक प्रमाणात लॉन्च (Launch) होत आहेत. आत्तापर्यंत देशात अनेक कंपन्यांनी त्यांची वाहने लॉन्च केली असून आता नवीन बातमी समोर अली आहे.

ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) कंपनीने पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात 10 हजाराहून अधिक इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची घोषणा (Declaration) केली आहे. कंपनीने सांगितले की, लॉन्च करण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा (Two wheelers, three wheelers and electric tractors) समावेश असेल. ही वाहने चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स करण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये चाचण्या सुरू आहेत

OSM कंपनीचे चेअरमन उदय नारंग यांनी भारतात प्रथमच लाँच होणार्‍या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरबद्दल सविस्तरपणे सांगितले. ते म्हणाले, “कंपनीने दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये आपली संशोधन-विकास केंद्रे स्थापन केली आहेत.

त्या केंद्रांवर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होताच, आम्ही हे ट्रॅक्टर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारतात लाँच करू. 2022-23 च्या अखेरीस शहरांमध्ये या वाहनांची सर्व्हिसिंग आणि भाडेतत्त्वावर देण्याची नवीन संकल्पना देखील आम्ही घेणून येणार आहे.

कंपनीचे कार्यालय फरीदाबाद येथे आहे

फरीदाबादस्थित कंपनी OSM इलेक्ट्रिक तीन वाहने बनवते. याशिवाय छोटी व्यावसायिक वाहनेही कंपनी बनवतात. बाजारातील मागणी पाहता त्यांची कंपनी लवकरच ड्रोन, ट्रॅक्टर आणि दुचाकी बाजारात आणणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले आहे.

OSM कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर लॉन्च करून भारताच्या ऑटो क्षेत्रात प्रवेश केला. दिल्लीत या ऑटोची किंमत 3.40 लाख रुपये आहे.