Electricity Bill Saving Tips : वीजबिलाची मिटली कटकट! ‘या’ सोप्या पद्धतीने वाचवा वीज बिल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electricity Bill Saving Tips : सध्याच्या काळात वीज खूप महत्त्वाची आहे. विजेशिवाय अनेक कामे रखडली जातात. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वीजपुरवठा करण्यात आला आहे. परंतु वापर जास्त असल्याने वीज बिल खूप येते. त्यामुळे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडते.

उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त वीजबिल येते. त्यामुळे या काळात इतर ऋतुंपेक्षा जास्त वीजबिल येते. जर तुम्हीही वाढत्या वीजबिलाला हैराण झाला असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही वीज बिल वाचवू शकता. कसे ते पहा.

एलईडी दिव्यांचा करा वापर

जर तुम्हाला विजेची बचत करायची असेल तर तुम्ही तुमच्या घरात एलईडी दिवे वापरावेत. समजा तुम्ही जुने बल्ब आणि सीएफएल वापरत असाल तर आत्ताच त्याऐवजी एलईडी बल्ब वापरायला सुरुवात करा. त्यामुळे तुमची वीज वाचू शकते.

बीईई रेटिंग डिव्हाइस

तसेच तुम्ही तुमच्या घरात बीईई उपकरणे वापरा. कारण ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी द्वारे बीईई स्टार रेटिंग डिव्हाइसेसची ऊर्जा कार्यक्षमता मोजून प्रमाणित करण्यासाठी वापरण्यात येते, यात 5 स्टार रेटिंग असणारी उपकरणे सर्वोत्तम उपकरणे मानली जातात. 1 स्टार रेटिंग असणारे उपकरण 30 टक्के विजेची बचत करते.

BLDC पंखे

आता तुम्ही बीएलडीसी पंखे वापरूनही विजेची बचत करू शकता. कारण BLDC पंख्यांची लोकप्रियता वाढतअसून जे थेट करंट विजेवर काम करतात. याद्वारे तुम्हाला इतर पंख्यांच्या तुलनेत 60 टक्के विजेची बचत करता येईल.

कारण नसताना वापरू नका उपकरणे

अनेकांना टीव्ही, पंखे किंवा इतर उपकरणे कारण नसताना चालू ठेवण्याची सवय असते. जर आता तुम्हालाही अशीच सवय असेल तर ती लगेचच बदला. टीव्ही पाहायचा नसताना रिमोट वापरण्यापेक्षा थेट पॉवर पॉइंटवरून टीव्ही बंद करा. लाईट-फॅनची गरज नसल्यास तो विनाकारण लावू नका.

एसी

उन्हाळ्याच्या दिवसात जास्त वीजबिल येण्याचे कारण म्हणजे एसीचा जास्त वापर. समजा तुम्हाला विजेचे बिल जास्त येऊ नये आणि तुम्हाला एसी चालवायचा असल्यास त्यासाठी तुम्ही 24 डिग्रीवर एसी चालवा.