Elon Musk News : Tesla साठी इलॉन मस्कने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; अनेक चर्चांना उधाण, वाचा सविस्तर

Elon Musk News :  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहते. इलॉन मस्कइलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आणि स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन स्पेसएक्सचे संस्थापक असून काही दिवसापूर्वीच ते ट्विटरचे देखील मालक बनले आहे.

आता पुन्हा एकदा इलॉन मस्क चर्चेत आहे. त्यांनी आपली  इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

चीनमधील कंपनीच्या प्रमुखाला अमेरिकेत मोठी जबाबदारी  

अमेरिकेतील टेस्ला कंपनीच्या चीनच्या प्रमुखाला मोठी जबाबदारी देणार आहेत. सध्या टॉम झू हे टेस्लाच्या चीन शाखेचे प्रमुख आहेत. अॅलन लवकरच टॉमला टेस्लाच्या ऑस्टिन, टेक्सास, यूएसए येथे असलेल्या गिगाफॅक्टरीची जबाबदारी देणार आहे.

मात्र, टॉम चीनमध्ये आपल्या जबाबदाऱ्या सांभाळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अहवालानुसार, टेक्सासमधील टेस्ला गिगाफॅक्टरी व्यवस्थापित करण्यासाठी टॉमने त्याच्या स्वत: च्या अभियंत्यांची एक टीम चीनमधून आणली आहे.

कंपनीने अद्याप कोणतेही वक्तव्य दिलेले नाही

टॉमला टेस्लाच्या टेक्सास गिगाफॅक्टरीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आल्याच्या वृत्तावर टेस्लाकडून आतापर्यंत कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

टेक्सासची टेस्ला गिगाफॅक्टरी या वर्षी उघडली  

टेस्लाची टेक्सासमधील ऑस्टिन शहरात असलेली गिगाफॅक्टरी या वर्षी सुरू झाली. मोठ्या प्रमाणावरील कारखाना कंपनीची मॉडेल Y इलेक्ट्रिक वाहने आणि आगामी टेस्ला सायबर ट्रक देखील तयार करेल.

हे पण वाचा :-    iQOO Smartphone : प्रतीक्षा संपली ! भन्नाट फीचर्ससह iQOO 11 5G आणि iQOO 11 Pro लॉन्च; किंमत आहे फक्त ..