अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 : –श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावच्या आजी माजी सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतच्या सुमारे २६ लाख ८८ हजार २५२ रुपयांच्या निधीचा वेळोवेळी अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा.
यासाठी लोणी व्यंकनाथ येथील राजेंद्र काकडे, स्वप्नील लाटे, दादा मडके यांच्यासह ग्रामस्थ तहसिल कार्यालयासमोर सोमवारी उपोषणाला बसल्याने सोमवारी रात्री उशिरा विस्तार अधिकारी सारीका हराळ
यांनी याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात माजी सरपंच सुभाष माने, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर व विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
माजी सरपंच सुभाष माने, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ काशिनाथ खामकर यांनी लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायती मध्ये संगनमताने १४ व्या वित्त आयोगातील निधी व वित्त आयोगाच्या आराखड्यात समाविष्ट नसलेली काही कामे इन्व्हर्टर खरेदी कार्यालय पीओपी ,
स्मशानभूमी मुरुमीकरण , कार्यालय विस्तार , पेव्हर ब्लॉक , एलईडी दिवे , फर्निचर इत्यादी कामात अनियमितता व कागदोपत्री कामे दाखवून २५ लाख ५६ हजार २५२ रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला . त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर ,
यांच्या जानेवारी २०२० ते आजअखेर कालावधीत पवारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत बे शेंडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत या कामात प्रत्यक्ष काम न करता १ लाख ३२ हजारांची बिले काढून शासनाची फसवणूक केले प्रकरणी चौकशी पूर्ण होऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश झाले असताना
देखील गुन्हे दखल होत नसल्याने लोणी व्यंकनाथ येथील राजेंद्र काकडे , स्वप्नील लाटे , दादा मडके यांच्यासह ग्रामस्थ तहसिल कार्यालयासमोर सोमवारी उपोषणाला बसल्याने सोमवारी रात्री उशिरा विस्तार अधिकारी सारीका हराळ
यानी याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात माजी सरपंच सुभाष माने , तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर व विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल केला.