अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- शहर असो किंवा गाव अतिक्रमणाची समस्यां सर्वत्र सारखीच आहे. यामुळे प्रशासन देखील त्रासले आहे.
नुकतेच नगर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या असलेल्या चितळे रोडवरील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय जमिनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे.
हे अतिक्रमण हटविण्यात यावे, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी महापालिका आयुक्तांना ३१ ऑगस्ट रोजीच पत्र दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, चितळे रोडवरील शासकीय जमिनीवर खासगी लोकांनी पक्के बांधकामाचे अतिक्रमण केले आहे.
खासगी व्यक्तीकडे चौकशी केली असता, महापालिकेनेच बांधकामाला परवानगी दिल्याचे सांगण्यात आले आहे, असे पोखरणा यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हे बांधकाम तत्काळ जमीनदोस्त करावे, तसेच हा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, हे बांधकाम पूर्वीपासून असल्याचेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान महापालिकेला पत्र देऊन एक महिना झाला तरी या पत्रावर कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे.