ऊर्जामंत्री तनपुरे म्हणाले कि… भाजप सरकारने मागील पाच वर्षांत काय केले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-वांबोरी ग्रामपंचायतीत राज्याचे उर्जा व नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक विकास कामांचा आढावा घेतला.

यावेळी तनपुरे यांनी विरोधीपक्षावर चांगलीच टीकास्त्र सोडले आहे. राज्यात विजेच्या चा प्रश्नावर बोलताना तनपुरे म्हणाले कि, भाजप सरकारने मागील पाच वर्षांत काय केले? याचे उत्तर द्यावे, मी महाराष्ट्राचा मंत्री आहे,

त्यांच्या आमदारांनी एक ट्रान्सफार्मरही बसविला नाही, असा टोला तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना नाव न घेता लगावला. दरम्यान विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी एक महत्वपूर्ण माहिती देखील दिली.

तनपुरे म्हणाले कि, वांबोरी गावाला व वाड्यावस्त्यांसाठी थेट मुळा धरणातून स्वतंत्र पाणीयोजनेसाठी जलजीवन पाणीयोजनेच्या माध्यमातून आराखडा तयार केला आहे.

त्यासाठी 28 कोटी रुपये खर्च येणार असून ते काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन तनपुरे यांनी केले. नगर-वांबोरी रस्ता, स्वतंत्र पाणी योजना, सौरऊर्जा प्रकल्प, वीजप्रश्न आदींचा आढावा त्यांनी घेतला.

मंत्री तनपुरे म्हणाले, नगर-वांबोरी रस्त्यासाठी मागील अर्थसंकल्पात तरतूद करून मंजुरी घेतली होती. परंतु करोनाचे संकट आल्यानंतर लॉकडाऊन झाले. त्यामुळे काही कामे थांबली आहेत.

आता पुन्हा आम्ही या रस्त्याची प्रक्रिया करून सुमारे 5 कोटी 80 लाख मंजूर केले आहेत. सोमवारी या रस्त्याच्या कामासाठी टेंडर फ्लॅश होतील. ही कामे दर्जेदार होतील, तशा सूचना दिल्या आहेत.

वांबोरी ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही मतदारांना विकास कामांचे आश्वासने दिली होती. ते पूर्ण करण्यासाठी मदत करा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी तनपुरे यांच्याकडे त्यांनी केली.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24