आता पुरे झाले… शाळांच्या आवारात थुंकणे पिचकारी बहाद्दरांना पडणार महागात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- गोवा – मावा, गुटखा, तंबाखू… आदी तंबाखू जन्य पदार्थ तोंडात टाकल्यावर पिचकारी मारणाऱ्यांची संख्या आजही दिवसेंदिवस वाढतच आहे.

याला कोठेतरी आळा बसावा म्हणून पिचकारी मारणाऱ्यांनो आता सावधान व्हा कारण पिचकारी मारली तर तुम्हाला आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे. करोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था आणि शाळांच्या आवारा थुंकण्यास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

या ठिकाणी शिक्षक, पालक व सामान्य नागरिक थुंकल्यास आता त्यांना 200 रुपयांचा दंड होणार आहे. एवढेच नव्हेतर असे वारंवार घडल्यास कमाल 1200 रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची मुल्ये अंगी रुजवण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.

याबाबतचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने नुकतेच जारी केले आहेत. शाळा परिसरात थुंकल्यामुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये व विद्यार्थ्यांना कोविड व इतर रोगांची लागण होऊ नये याकरिता सर्व शैक्षणिक संस्थामध्ये थुंकणे विरोधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

जाणून घ्या नेमक्या काय आहेत मार्गदर्शक सूचना? सर्व शैक्षणिक संस्थाच्या (शैक्षणिक संस्था है सार्वजनिक ठिकाणी असल्यामुळे) परिसरात प्रतिबंध करण्यात येत आहे. कोविड-19 प्रादुर्भावामुळे लोकडाऊन कालावधीत ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे.

या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वर्ग सुरू होण्यापूर्वी थुंकल्याने होणारे आजाराविषयी माहिती द्यावी व स्वच्छतेची मूल्ये करण्यासाठी प्रोत्साहीत करावे. शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने निर्माण होणारे आरोग्यविषयक संसर्गा विषयी स्थानिक आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने मार्गदर्शन करावे व त्यांना यापासून परावृत्त करावे,

त्यांना स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्याकरिता मार्गदर्शन करावे. शिक्षक के विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. त्यामुळे शाळेतील या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

शिक्षकांकडून या सूचनांचे उल्लंघन झाल्यास प्रतिव्यक्ती 200 रुपये दंड वसूल करण्यात येईल कमाल 1200 रु. पर्यंत दंड देय राहील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत सामान्य नागरिकांची ही जबाबदारी आहे. अशा व्यक्तीकडून या सूचनांचे उल्लंघन झाल्यास प्रतिव्यक्ती 200 रूपये असा दंड वसूल करण्यात येईल.

असे वारंवार घडल्यास कमाल 1200 रू. पर्यंत दंड देय राहील. सदर प्रकरणी दंड वसूल करण्याचा अधिकार हा संबंधित शैक्षणिक संस्थेतील प्रमुख म्हणजेच मुख्याध्यापक/प्राचार्य यांना राहील. या मार्गदर्शक सूचनांच्या नियमित देखरेखीसाठी संबंधित शैक्षणिक संस्थेचे प्रमुख शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांनी प्राधिकृत केलेले शिक्षक यांची असेल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24