अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- संगमनेर येथील श्री.भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेतून कर्ज काढून पुन्हा खोटा दस्तऐवज करून संग्राम पतसंस्थेतून लाखोचे कर्ज काढून फसवणूक करणारा
उद्याेजक प्रवीण देशमुख (४२, नवलेवाडी-अकोले) याला पतसंस्थेचे मॅनेजर उमेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली.
देशमुखची पत्नी व बनावट दस्तऐवज तयार करणारा तलाठी गुलाब बारामते (धुमाळवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.