अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने भारतरत्न जे.आर.डी उद्योग विभूषण पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथे प्रदान करण्यात आला.
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे यांच्यावतीने संगमनेर येथे शनिवारी मालपाणी लॉन्स मध्ये उद्योजक गिरीश मालपाणी यांचे अध्यक्षतेखाली व ना.बाळासाहेब थोरात यांचे हस्ते संपन्न भारतरत्न जे आर डी टाटा उद्योग पुरस्कार संपन्न झाला.
यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे,नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे,परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे, उद्योजक रंगनाथ गोडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना ना.बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी संयोजकांनी अत्यंत संघर्षमय परिस्थितीतुन यशस्वी झालेल्या व्यक्तींची निवड केली आहे.
आजकाल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारबद्दल न बोललेलं बरं मात्र अश्या परिस्थिती मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदने योग्य माणसाची केलेली निवड कौतुकास पात्र आहे,पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड ही त्या पुरस्काराची उंची वाढवते.कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले
यांनी प्रास्तविक केले यावेळी उद्योग विभूषण पुरस्कार-मा. गणेश भांड(संस्थापक अध्यक्ष-चैतन्य उद्योग समूह,देवळाली प्रवरा),उद्योग मित्र पुरस्कार -मा.सचिन ईटकर(आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार),
उद्योगरत्पुरस्कार- मा.मारोतराव कवळे गुरुजी(व्ही.पी.के.ऍग्रो अँड फूड ग्रुप,सिंधी ता.उमरी जि. नांदेड),उद्योग भूषण पुरस्कार- मा नानासाहेब हरिभाऊ वर्पे(सुप्रभा पॉलीमर्स,संगमनेर),कृषिपुरक उद्योग पुरस्कार-मा.सतीश आभाळे(अश्विनाथ ऍग्रो पोल्ट्री, चिंचोली गुरव),
उद्योगसखी पुरस्कार-मा.अक्षरा राऊत(मॅनेजर-डायनोमर्क कंट्रोल्स, पुणे), उद्योग सारथी पुरस्कार-मा.हेमंत नेमाडे(सिनियर मॅनेजर-डायनोमर्क कंट्रोल्स, पुणे) या यशस्वी उद्योजकाना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परीषद चे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले,जेष्ठ उद्योजक रंगनाथ गोडगे,मसाप अध्यक्ष मुरलीधर साठे,मुकुंद आवटे,नागेश वासतकर,अरुण गराडे,जयवंत भोसले, सुनील उकिरडे, राजेंद्र वाघ,सुरेश कंक,प्रदीप गांधलीकर यांनी परीश्रम घेतले.दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले.