उद्योजक गणेश भांड यांना उद्योजक विभूषण पुरस्कार घोषित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांना पुणे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद यांच्यावतीने ‘भारतरत्न जे.आर.डी. टाटा उद्योग विभूषण पुरस्कार’ नुकताच घोषित झाला आहे.

देवळाली प्रवरातील उद्योजक गणेश भांड यांनी नोकरीत मन न रमवता चैतन्य मिल्क प्रकल्प सुरू केला.

या माध्यमातून शेतकरी कष्टकरी शेतकरी यांना योग्य न्याय व अनेक रिकाम्या हातांना रोजगार उपलब्ध करून दिला.

केवळ उद्योग क्षेत्रापुरते मर्यादित न राहाता सामाजिक, धार्मिक क्षेत्रात गणेश दादा भांड यांनी भरीव योगदान दिले असल्याने

त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुणे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद यांच्यावतीने ‘भारतरत्न जे.आर.डी. टाटा उद्योग विभूषण पुरस्कार’ घोषित केला असून

या पुरस्काराचे वितरण जुलै महिन्यात संगमनेर येथील शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली.

यावेळी रंगनाथ घोडगे, राजेंद्र वाघ,सुरेश कंक,सुनील उकिर्डे आदी उपस्थित होते. गणेश दादा भांड यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24