EPFO Alert : खासगी किंवा सरकारी नोकरी करत असाल आणि तुमच्याही पगारातील काही रक्कम पीएफ मध्ये कापली जात असेल तर तुमच्यासाठी ही आहे. कारण EPFO ने कोट्यवधी नोकरदारांना इशारा दिला आहे.
EPFO चे सदस्य असण्याचा अर्थ असा आहे की तुमचा PF दर महिन्याला कापला जातो. ज्या कर्मचाऱ्यांचा पीएफ कापला गेला आहे त्यांच्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ईपीएफओच्या नावावर अनेक घोटाळे समोर आल्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कधीही EPFO खाजगी माहिती विचारात नाही
ईपीएफओने यापूर्वीही अशा प्रकारचे अलर्ट जारी केले आहेत, मात्र गेल्या काही दिवसांत फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
ईपीएफओच्या वतीने ट्विट करून सांगण्यात आले की, ईपीएफओ कधीही फोन, सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप इत्यादींद्वारे सदस्यांकडून पॅन, आधार, यूएएन, बँक खाते आणि ओपीटी यांसारखी वैयक्तिक माहिती विचारत नाही.
कोणत्याही कॉल ला उत्तर देऊ नका
ईपीएफओकडून असा इशारा देण्यात आला होता की, ईपीएफओ कोणत्याही सेवेशी संबंधित माहितीसाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप इत्यादीद्वारे कधीही पैसे जमा करण्यास सांगत नाही. अशा परिस्थितीत, सर्व सदस्यांनी अशा कोणत्याही कॉल किंवा व्हॉट्सअॅप कॉलला उत्तर देऊ नये असा सल्ला दिला जातो.
नियोक्त्याचा हिस्सा दोन भागांमध्ये जमा केला जातो
EPFO सदस्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम EPFO खात्यात जमा केली जाते. त्याचप्रमाणे मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम नियोक्त्याने भरावी लागते. या 12 टक्के मध्ये दोन भाग आहेत.
12 टक्क्यांपैकी 8.33 टक्क्यांचा पहिला भाग कर्मचारी पेन्शन अकाउंट (EPS) आणि उर्वरित 3.67 टक्के रक्कम EPF खात्यात जाते. ही रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळण्याची तरतूद आहे. पण जॉबच्या दरम्यानही गरज पडल्यास ती काढून टाकू शकता.