Microsoft Windows : मायक्रोसॉफ्ट ही एक टेक्नॉलॉजी कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Windows 7 आणि Windows 8/8.1 साठी Chrome सपोर्ट बंद केला आहे. अशातच या कंपनीने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे याचा वापरकर्त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. कंपनीच्या या निर्णयामुळे विंडोज 10 होम आणि प्रो डाउनलोड 31 जानेवारी 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीनेच याबाबत माहिती दिली आहे.
या दिवशी मिळणार अपडेट्स
मायक्रोसॉफ्टने आपल्या Windows 10 उत्पादन पेजवर एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यात कंपनीने असे सांगितले आहे की विंडोज 10 होम आणि प्रो डाउनलोड फक्त 31 जानेवारी 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. व्हायरस, स्पायवेअर आणि इतर मालवेअरपासून पीसीचे संरक्षण करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरक्षा अपडेट्स प्राप्त करत राहणार आहे.
ग्राहकांना वरील टाइम विंडोपर्यंत अधिकृत साइटवरून Windows 10 Home आणि Windows 10 Pro खरेदी करता येईल. आपल्या ग्राहकांना Windows 10 साठी खरेदी पर्यायांबद्दल नवीनतम माहिती उपलब्ध असल्याची खात्री करण्यासाठी कंपनीने Windows 10 उत्पादन पेजवर हे अपडेट जारी केले आहे.
कंपनी देत आहे विंडोज 11 वर लक्ष
खरं तर, कंपनी आपल्या नवीनतम विंडोज 11 वर लक्ष केंद्रित करत असून कंपनीने 2015 मध्ये पहिल्यांदा विंडोज 10, तर विंडोज 11 ऑक्टोबर 2021 मध्ये आणला होता. त्यामुळे आता कंपनी ऑक्टोबर 2025 पासून विंडोज 10 ला सपोर्ट करणे पूर्णपणे बंद करत आहे.
बंद आहेत काही Google Chrome च्या आवृत्त्या
नुकताच कंपनीकडून Windows 7 आणि Windows 8/8.1 साठी Chrome सपोर्ट बंद करण्यात आला आहे. Chrome 109 हे शेवटचे आवृत्ती अपडेट होते. याव्यतिरिक्त, वेबव्ह्यू 2 साठी समर्थन 10 जानेवारीला समाप्त झाले असून मायक्रोसॉफ्ट एज 109 लाँच झालेले आहे. तसेच या उपकरणांमध्ये क्रोम अजूनही चालवले जाऊ शकते, परंतु हे लक्षात ठेवा की कंपनीकडून त्यासाठी कोणतेही सुरक्षा अपडेट जारी करण्यात येणार नाही.