अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोपरगाव तहसील कार्यालय येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. त्यानुसार कोपरगावात हे कार्यालय सुरु केले आहे.
यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,
गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,
ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर…आदी उपस्थित होते. अतिवृष्टी,महापूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मोठी मदत होणार आहे .
यावेळी पावसाळ्याच्या आधी तालुक्यातील ओढे-नाले साफ करून घेण्याचा सूचना आ. काळे यांनी जलनि:सारण विभागाला दिल्या आहेत.