अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक कठोर पाऊले उचलली आहे.
यातच सध्याच्या स्थितीला शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने प्रशासनाकडून अशा बेफिकीर नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे.
यातच अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे वाहने देखील जप्त केली जात आहे. यातच आता हिंडफिरया नागरिकांवर वचक निर्माण व्हावा यासाठी नगर शहरात बारा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे पथके विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू करत संचारबंदी केली आहे; मात्र बहुतांश जण विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. अशा बेफिकीर लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत.
दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी पकडताच अनेक जण वेगवेगळी कारणे सांगतात, किराणा संपला, भाजीपाला नाही, डोकं, मेडिकलमध्ये चाललो…अशी कारणे सांगत आहे.
ज्यांना अत्यावश्यक काम आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत मात्र जे विनाकारण फिरतात त्यांच्यावर सध्या जिल्हाभरात कडक कारवाई सुरू आहे.
या कारवाईसाठी नगर शहरात बारा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील चौकाचौकात ही पथके तैनात करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.