१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेच्या मूल्यमापनाचे मानधन मिळावे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेच्या मूल्यमापनाचे मानधन मिळावे- रामराव काळे शिक्षक भारती संघटनेची मागणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे अंतर्गत दरवर्षी परीक्षा घेऊन त्याचे परिक्षण व नियमन शिक्षक करत असतात त्याचे मानधन देखील मिळत असते पण सन २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारी मुळे इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाची सर्व जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर दिली .

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 31 जुलै पर्यंत सर्व निकाल पूर्ण करावे असे आदेश असतांना अत्यंत कमी कालावधीत अत्यंत किचकट मूल्यमापन प्रक्रिया शिक्षकांनी पूर्ण केली आहे त्या मूल्यमापनाचे मानधन शिक्षकांना मिळावे यासाठी बोर्डाचे अध्यक्ष यांना शिक्षकांच्या सह्यांचे निवेदन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामराव काळे,

सरचिटणीस महेश पाडेकर यांनी दिले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकांना अतिशय परिश्रम घेऊन अत्यंत कमी वेळेत योग्य मूल्यमापन केले त्यांना मानधन मिळायलाच हवे या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे ,माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे ,

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे ,शेवगाव तालुकाध्यक्ष मफीज इनामदार,सचिन लगड, श्रीगोंदा महिला अध्यक्ष रूपाली बोरुडे, रुपाली कुरूमकर,कैलास राहणे,कोषाध्यक्ष सुनील साबळे,श्याम जगताप,दिनेश शेळके ,प्रवीण मते,संजय तमनर, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, बाबासाहेब लोंढे,राजेंद्र जाधव,सुदाम दिघे,संभाजी पवार,कैलास जाधव,नवनाथ घोरपडे,किसन सोनवणे,सिकंदर शेख, संजय पवार,

सुदर्शन ढगे,अशोक अन्हाट,संभाजी चौधरी,मोहंमद समी शेख,श्रीकांत गाडगे,सुर्यकांत बांदल जॉन सोनवणे,बाळासाहेब शिंदे, रेवन घंगाळे,प्रशांत कुलकर्णी, एम पी शिर्के,हनुमंत बोरुडे,सोमनाथ बोंतले,प्रकाश मिंड,मधुकर नागवडे,महादेव कोठारे,संतोष देशमुख,योगेश कराळे, महिला जिल्हाध्यक्ष, आशा मगर,विभावरी रोकडे,मीनाक्षी सूर्यवंशी, शकुंतला वाळुंज,छाया लष्करे, काशीनाथ मते सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी शिक्षक भारती संघटना अहमदनगर आदींनी पाठींबा दिला

अहमदनगर लाईव्ह 24