लग्न झालेले असतानाही दुसऱ्याशी बांधली लगीनगाठ आणि पुढे झाले असे काही….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- पती व दोन मुले असतानाही दुसरे लग्न करून तरुणाला एक लाखाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सागर दिलीपलाल भंडारी (रा. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे.

दाखल फिर्यादीवरून तरुणीसह तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणातील कावेरी शांती लिंगायत (वय 31 रा. सोलापूर) असे या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी तिला अटक केली आहे. तर तिचे पंटर बसवराज (पूर्ण नाव माहिती नाही) व भारती रवींद्र झाडमुथ्या (रा. बीड) या दोघांवरही गुन्हा दाखल असून ते पसार झाले आहेत.

दरम्यान कावेरी लिंगायत हिला न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दुर्गेे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कावेरी लिंगायत या तरुणीचे पहिले लग्न झालेले होते. तिला दोन मुले आहेत. असे असतानाही तिने दोन पंटरच्या मध्यस्थीने फिर्यादी सागर भंडारी यांच्यासोबत लग्न केले.

त्यांच्याकडून एक लाख रुपयांची रक्कम घेतली. परंतु, सागर यांना तिच्या पहिल्या लग्नाची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुर्गे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24