ताज्या बातम्या

सत्ता नसली तरी आम्ही जनतेला सोडलेले नाही ..! आमदार राजळे यांची विरोधकांवर टीका

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :-  सरकार जरी नसले तरी माजी मंत्री पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामे करत असुन, जनतेला सोडलेले नाही. परंतु सध्याच्या काळात शेतकरी आणि ग्रामिण जनतेला वाऱ्यावर सोडणारे निर्णय घेतले जात आहेत.

नुकताच सरकारने घेतलेला किराणा मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय दुदैवी आहे. विरोधी मंडळीकडुन चुकीच्या पध्दतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

किमान आमदार आणि खासदार यांनी दिलेल्या निधीचे तरी त्यांना उदघाटन करु देणे गरजेचे असतांना नियोजित उदघाटन ठरल्यानंतर त्याआगोदर जाऊन उदघाटन करण्याची नवी पध्दती विरोधकांकडुन राबविण्यात येत आहे.

अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. एका विकास कामाचे उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, पत्रकार परीषदा आम्हाला ही घेता येतात .

आमच्याकडे देखील राजकारणास लागणा-या सर्व गोष्टी असुन आपणच हुशार आहोत अशापध्दतीचे काही लोक भासविण्याचा प्रयत्न करत आहेत.

परंतु जनता आमच्यासोबत आहे .विकासाची जी काही कामे झाली ती आम्ही केली आहेत. तुमचे सरकार आहे तिथुन तालुक्याच्या विकासासाठी काही निधी कसा आणता येईन हे पहावे व आलेल्या निधीची उदघाटने करावीत. अशी टिका आमदार मोनकिताई राजळे यांनी केली.

Ahmednagarlive24 Office