अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारी तेल कंपन्यांनी आजही इंधनाच्या दरात वाढ केली आहे.
सध्या देशभरातील विविध शहरात सोन्याच्या किंमती सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलमध्ये दर 105.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 96.91 रुपये प्रति लीटर आहेत. देशातील जवळपास 11 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत.
या 11 राज्यांच्या यादीमध्ये राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, कनार्टक, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, तमिळनाडू आणि लडाख आहे. देशभरात सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या गंगानगरमध्ये मिळत आहे.
असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात.
नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.