सत्ता नसतांना देखील समृद्धी प्रकल्पबाधितांना भरपाईच्या बाबतीत न्याय मिळवून दिला – आ. आशुतोष काळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत करीत असतांना बागायती जमीन जिरायती दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात लाटण्याचा प्रयत्न सुरु होता.

आपल्या जमिनी मातीमोल भावात जाणार या चिंतेने अनेक शेतकऱ्यांना उच्च रक्तदाबाचे विकार जडले होते. अशा वेळी या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देवून सत्ता नसतांना देखील न्याय दिला असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे २४ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या श्री हनुमान मंदिर पानमळा या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहीत केल्या जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा त्याबाबत शासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा व्हावी अशी बहुसंख्य बाधित शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या मात्र सोयीस्करपणे शेतकऱ्यांना टाळले जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या.

त्यावेळी यास शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी विद्यमान शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी टोकाची भूमिका घेतली. त्याची शिक्षा देखील मिळाली मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्यामुळे मिळालेली ही शिक्षा हसत हसत सहन केली. एन.एच. १६० च्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही.

सत्ताधारी आमदार असल्याचा फायदा घेत शासनदरबारी पाठपुरावा करून त्यांना देखील प्रकल्पबाधितांना त्यांच्या जिमिनीचा, घरांचा व सरकारी जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना देखील त्यांच्या घरांचा व दुकानांचा योग्य मोबदला मिळवून दिला आहे.

भविष्यात देखील ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बाबतीत असे प्रसंग निर्माण होतील त्या-त्या वेळी परिणामांची चिंता न करता त्या शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे राहू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.