लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटिजन टेस्ट होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सुरु करण्यात आली. दरम्यान जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये आढळून आली आहे.

यामुळे या भागांमध्ये कोरोनाच्या टेस्ट अधिक होणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी भोसले यांनी या सूचना शनिवारी (दि.८) व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटिजन टेस्ट होणार आहे.

ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीचे लसीकरण न करता त्याची लक्षणे बघून सौम्य लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये व मध्यम तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24