अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-पोलीस जनतेशी कसे वागतात. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतात का, हे जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णाप्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहरातील तीन पोलीस ठाण्यांना रात्री वेषांतर करून दिलेली भेट आणि तिथे प्रत्यक्ष पोलिसांच्या कामकाजाचा घेतलेला अनुभव उल्लेखनीय आहे.
सद्यपरिस्थितीत प्रत्येक पोलीस ठाण्यात कृष्णप्रकाश यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांची गरज असल्याचे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुका अध्यक्ष मोझेस दास यांनी व्यक्त केले आहे.
दास यांनी पोलीस आयुक्त कृष्णाप्रकाश यांना पत्र पाठवून त्यांच्या या अनोख्या वेषांतर भेटीचे कौतुक केले शिवाय त्यांच्या या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पोलीस आयुक्तपदी रुजू झाल्यापासून आपण धडाकेबाज कामगिरी केली व करीत आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्यात आपल्याला यश आले आहे.अनेक गुंडांवर मोक्काची कारवाई झाली.
अनेकांना तडीपार केले, काही तुरुंगात स्थानबद्ध केले. एकूणच आपण गुन्हेगारांवर जबरदस्त वचक बसवला.पोलीस आयुक्त कृष्णाप्रकाश आणि सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी नुकतेच वेषांतर करून पिंपरी,
हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यांना रात्रीच्या वेळी अचानक भेटी दिल्या. या भेटीत ते सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या तक्रारी घेऊन पोलिसांकडे दाद मागणीसाठी गेले होते.