Maharashtra Politics : “माजी मुख्यमंत्री हे सौजन्याची मूर्ती नाही, तर सुडाची मूर्ती” त्यांना बदला घेईचा होता…

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हे, रात्री अपरात्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका आणि शिंदे-ठाकरे गटातील वाद यामुळे राजकारण आणखी तापल्याचे पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अरविंद सावंत यांनी नाव न घेता फडणवीसांवर टीका केली आहे.

अरविंद सावंत म्हणाले, की माजी मुख्यमंत्री हे सौजन्याची मूर्ती नाही, तर सुडाची मूर्ती आहेत असा घणाघाती टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला आहे.

Advertisement

तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची आठवणही करून दिली आहे. ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री यांनी स्वतः काल परवा मला बदला घ्यायचा होतं, असं स्पष्ट म्हटलं होतं.

सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय असा टोला लगावला आहे. तसेच पाहण्यात झालेल्या शिंदे आणि ठाकरे गटातील राड्यावरून त्यांनी भाष्य केले आहे.

अरविंद सावंत म्हणाले, माझ्या विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधात माणसं उभी राहतात, हे त्यांना (एकनाथ शिंदे यांना) झोंबलंय, म्हणून ही प्रतिक्रिया आली. ही प्रतिक्रिया मागे बोलत राहते, ‘तुम्ही बघत बसला का?’

Advertisement

या प्रतिक्रियेतूनच हात चालवला आहे. दरम्यान, या राड्यात स्थानिक लोकं नाहीत, त्यात बाहेरुन आलेली लोकं होती, असा गंभीर आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे.

अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या रात्रीच्या बैठकीवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना रात्री भेटायची सवयच आहे असे ते म्हणाले. त्यांनी याआधी जे कट कारस्थान रचलं, ते तर वेशांतर करुन केलं आणि त्यावर सभागृहातही त्यांनी सांगितले होते.

Advertisement