अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील माजी सैनिक विश्वनाथ फुंदे यांच्या हत्याकांड प्रकरणातील पाचव्या आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईल जेरबंद केले आहे.
राहुल तुळशीराम मासाळकर रा. नाथनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी फाटा येथे दि.९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी फुंदे माजी सैनिक विश्वनाथ फुंदे
यांचे साईप्रेम नावाच्या हॉटेल समोर चारचाकी लावण्यावरून सुधीर शिरसाठ याचसोबत वाद झाला होता. माजी सैनिक फुंदे यांनी सुधीर संभाजी शिरसाठ याला हॉटेलच्या दारात गाडी लावू नका अशी विनंती केली.
मात्र जागा काय तुझ्या बापाची आहे काय? असे म्हणत शिरसाठ याने फुंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फोन करुन इतर सात ते आठ सहकाऱ्यांना बोलावून घेतत्यांच्यासह शिरसाट
याने फुंदे यांना लोखंडी पाईप रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना गाडीत घालून पाथर्डी येथील श्री तीलोक जैन विद्यालयाच्या प्रांगणात आणून पुन्हा मारहाण करण्यात आली होती.
या मारहाणीत फुंदे यांचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी दि.१२एप्रिल २०२१ रोजी राहुरी येथील डोंगरातून चौघेजन ताब्यात घेतले होते.