अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे सोमवार, दिनांक 28 जून ते 9 जुलै 2021 या दरम्यान (शासकीय सुट्टी, शनिवार व रविवार वगळून) दररोज सकाळी 8.30 ते दुपारी 12 पर्यंत दिव्यांग प्रमाणपत्रासाठीची तपासणी चालू राहील.
त्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी दोन पासपोर्ट साईज फोटो तसेच आधारकार्ड आणि रेशनकार्ड (मूळ प्रत आणि छायांकित प्रत) घेऊन यावे. त्याचप्रमाणे, लॉकडाऊनच्या अगोदर जी प्रमाणपत्रे तयार झालेली आहेत,
त्यांना दूरध्वनीद्वारे संदेश देऊन त्यांच्या प्रमाणपत्राचेही वाटप करण्यात येणार आहे, याची दिव्यांग बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी केले आहे.